शकुनी...
शकुनी...

1 min

238
हळूहळू बोलणे
कानी कुजबुजने
शेती बुजगावणे
करी भास सारा... ||१||
अहंकार जोपतो
मनी द्वेष पोसतो
उच निच राखतो
भेदभाव सारा...||२||
तुझे माझे वागणे
लागे असे बोलणे
रडी डाव साधणे
करी त्रास सारा...||३||
मारे कोपरखळी
तोडी घरे वेगळी
आढी दिसे कपाळी
डावपेच सारा ...||४||
असे राजकारणी
दोन अर्थी बोलणी
सदा करे करणी
बुद्धी भेद सारा... ||५||
गोलमोल बोलतो
खाली हात चोळतो
अन्ने विष घोळतो
कलीयुग धारा... ||६||