ती.....
ती.....


त्या तिथे आडोशाला
घेतलेला चहा,
अजून रेंगाळतो आहे
माझ्या ओठांवर....
लक्ष तरी कुठे होते आपले
आजूबाजूला...?
ठरलेल्या वेळेत
जीव डोळ्यात एकवटून
पहायचे होते
एकमेकांना ...!
चुकून झालेला
तो स्पर्श,
चुकून... की मुद्दामहून..?
कसाही असो...
सिध्द करत होता
opposite charges
attract each other...!
तो मंद प्रकाश
वाफाळलेला चहा
आणि हळू आवाजात
चालू असलेले
ये कहां आ गये हम
यूं ही साथ चलते चलते...गाणे...
नजरेने केलेल्या
चर्चेनंतर,
मी खरे तर
बोलणारच होतो ..पण..
तेव्हढ्यात तू म्हणालीस
चल... येते मी...
मला जायला हवं... आता...
तुला बाय करून
डोळे पुसलेला तो रूमाल
आजही ओला आहे
कोप-याला...!!
>
त्या तिथे आडोशाला
घेतलेला चहा,
अजून रेंगाळतो आहे
माझ्या ओठांवर....
लक्ष तरी कुठे होते आपले
आजूबाजूला...?
ठरलेल्या वेळेत
जीव डोळ्यात एकवटून
पहायचे होते
एकमेकांना ...!
चुकून झालेला
तो स्पर्श,
चुकून... की मुद्दामहून..?
कसाही असो...
सिध्द करत होता
opposite charges
attract each other...!
तो मंद प्रकाश
वाफाळलेला चहा
आणि हळू आवाजात
चालू असलेले
ये कहां आ गये हम
यूं ही साथ चलते चलते...गाणे...
नजरेने केलेल्या
चर्चेनंतर,
मी खरे तर
बोलणारच होतो ..पण..
तेव्हढ्यात तू म्हणालीस
चल... येते मी...
मला जायला हवं... आता...
तुला बाय करून
डोळे पुसलेला तो रूमाल
आजही ओला आहे
कोपऱ्याला...!!