चला शिमगा आला....
चला शिमगा आला....


उद्देश अनेक होते अनेक कथा लावल्या
ज्याने त्याने आपापल्या सतरंज्या ही टाकल्या
जातीपातींचे आकडे गोळाबेरीज मांडली
गरिबी दिसू लागली निवडणूका लागल्या
पहा घोर हा अन्याय गरिबाचा वाली नाही
अवचित माणूसकीच्या ह्या जाणिवा जागल्या
पाहूण्यांचे राज्य गेले शोषण झाले आमचे
स्वातंत्र्याच्या लढाईत व्यथा आम्हीच भोगल्या
नको वाद आपसात वाटून घेऊ भाकरी
जनतेचे पाहू नंतर ये रे माझ्या मागल्या