Friend
Friend


कधी तू अचानक
see off होते,
अन् मनपाखरू भिरभिरते
कावरे बावरे होवून...
मनाच्या पटलावर
तो हिरवा डॉट
कायम चमकत असतो
शुक्रा सारखा...
On line - offline च्या खेळात
क्वचित जुळते frequency
आणि भावतरंग उठतात
अंतर्मनात....
आपण या network ला
नाव नको द्यायला
कारण नाव दिले की
मालकी येते...
आता तर नावा समोर
Top fan badge आलाय,
दोन मनातलं अंतर
खरच असं मोजता येतं
लेबल लावून...?
Best वगैरे काही नको
Friend list मध्ये असू दे
माझे नाव... तळाला...
वाढदिवसाच्या शुभेच्छा मात्र
आठवणीने देत जा,
मला खरच गरज आहे
मनातून दिलेल्या
शुभेच्छांची.....