पेरणी....
पेरणी....

1 min

443
जसे विरहाचे दुःख
जणू उफानलं उरी
आज कोसळू येतय
जशा सरीवर सरी...
मृग दाराशी पोचला
तशी धरा आसावली
जशी माहेरची गाय
लेकराशी पान्हावली...
अमृताचा शिडकावा
शिण भाग दूर होई
नव्या उमेदीने पान
वा-यासंगे गाणे गाई...
नदी नाले आनंदाने
ओसंडून वाहू लागे
काळ संपला विरही
भेटीची चाहूल लागे...
मशागत केली मना
करा करा रे पेरणी
सर्वेतू सुखिनः संतू
घाला विचार तिफणी...