जीवनाची घडी
जीवनाची घडी
एक छान होती आमची छोटीशी वाडी
त्या वाडीत आईच्या संसाराची बसली होती जेमतेम घडी
बाप ओढत होता हमालाची गाडी
तो रोज ओढायचा गांजा अन् बिडी
नाच बघायला चढून जात होता माडी
पण आईला नाही आणली कधी नवीन साडी
आई होती माझी बिचारी भोळी,भाबडी
माझ्या प्रेमात झाली होती वेडी
एक दिवस पिऊन खाऊन घरी आला हातात घेऊन छडी
लाथाबुक्क्यांनी त्याने आईची मोडली बरगडी
त्याच्या या रोजच्या जाचाला कंटाळून
आईनं एक दिवस घेतली विहिरीत उडी
याची चाहूल लागताच आली पोलीस गाडी
बापाच्या हातात पडली कायमची बेडी
डॉक्टर,इंजिनीअर,वकीलीची स्वप्न पाहणारा मी
परिस्थितीमुळे नाईलाजाने ओढू हमालाची गाडी
अशी बदलली माझ्या जीवनाची घडी
अशी बदलली माझ्या जीवनाची घडी
