STORYMIRROR

Raju udmale

Others

4  

Raju udmale

Others

मी बाईपणात माझ्या

मी बाईपणात माझ्या

1 min
179

बाप म्हणविणार्‍या पुरुषाने 

असे कोणते पुण्य केले 

नऊ महिने नऊ दिवसांचे ओझे

 माझ्याच नशिबी आले

 सांगा ना यात माझे काय चुकले?

 मी बाईपणात माझ्या बाईपणास मुकले


 कितीही शिकली तरी

 चूल आणि मूल नाही चुकले

 माहेर-सासर करता करता 

मी मलाच हरवून बसले 

सांगा ना यात माझे काय चुकले?

 मी बाईपणात माझ्या बाईपणास मुकले 


हुंडा,संशय,शारीरिक-मानसिक

 छळात मी अनेकदा बळी गेले

 विनयभंग,बलात्कारासारखे कृत्यही

 माझ्याच नशिबी आले

सांगा यात माझे काय चुकले?

मी बाईपणात माझ्या बाईपणास मुकले


 महाभारतातील द्रौपदीचे

 भरदरबारात वस्त्रहरण केले

चौदा वर्षे वनवास करूनही

 अग्नी परीक्षेचे भोग सीतेच्या नशिबी आले 

सांगा ना यात माझे काय चुकले?

 मी बाईपणात माझ्या बाईपणास मुकले 


सासू-सून नणंद भावजय

कुणी असे नाते केले

 ताई-आत्या करता करता

 मी मलाच विसरून गेले

 सांगा ना यात माझे काय चुकले

 मी बाईपणात माझ्या बाईपणास मुकले 


लहानपणापासून मला शिकवले

 चुल बाहुलीचे खेळ 

माझ्या भावाला शिकवायला 

आई बापाला खूप होता वेळ

 सांगा ना यात माझे काय चुकले?

 मी बाई पणात माझ्या बाईपणास मुकले


 आईच्या गर्भात छकुलीचा

 द्वेष केला जातो

 सासु ननंदेच्या सांगण्यावरून

 गर्भपातही केला जातो

 तेथेही मी आईपणास मुकले

 सांगाना यात माझे काय चुकले? 

मी बाईपणात माझ्या बाईपणास मुकले


 बाप,भाऊ,नवरा,सासरा,जावई

 यांच्यासाठी मी माझे पूरे आयुष्य वेचले 

बालपण ,तारुण्य माझे 

मलाच कळले नाही कधी खचले

सांगा ना यात माझे काय चुकले? मी बाईपणात माझ्या बाईपणास मुकले

मी बाईपणात माझ्या बाईपणास मुकले


Rate this content
Log in