माझ्या आयुष्यात
माझ्या आयुष्यात
माझ्या आयुष्यात
मी जगलो, मी हरलो
मला नाकारलं, मी दुखावलो
मी नको त्यांचेवर विश्र्वास ठेवला
त्यांनीही विश्र्वासघात केला
क्षितीजाकडे पाहत चालताना मीही थोडासा रस्ता हुकलो
पण या सगळ्यांत मी खूप काही शिकलो
माझ्या आयुष्यात
यशाचे शिखर गाठण्याचे
सतत खुप प्रयत्न केले
तरीही मला कळेना
अपयशच पदरी का आले?
आपल्याच माणसांमुळे मी सतत यशाला मुकलो
पण या सगळ्यांत मी खूप काही शिकलो
माझ्या आयुष्यात
काही ठिकाणी मात्र सारे
नको ते चमत्कार घडले
सोयीचे डाव खेळून ही
सारे उलटेच फासे पडले
जीवन सारीपाटाच्या या खेळात मीही अनेकदा चाल चुकलो
पण या सगळ्यांत मी खूप काही शिकलो
माझ्या आयुष्यात
हसण्याचा आणी हसवण्याचा
मी सतत प्रयत्न केला
पण हा खेळही कधी कधी
माझ्याच अंगावर आला
प्रसंग हसण्याचा असूनही मी माझ्याच हसण्याला विसरलो
पण या सगळ्यांत मी खूप काही शिकलो
माझ्या आयुष्यात
परिस्थिती गरिबीची म्हणून
भूतकाळात कधी लाजलो नाही
आज जरी थोडा पैसा आला
म्हणून माजलो नाही
नफ्या तोट्याच्या या जीवन बाजारात शेवटपर्यत टिकलो
पण या सगळ्यांत मी खूप काही शिकलो
माझ्या आयुष्यात
संकटांना मी घाबरलो नाही
अपयशाने कधी खचलो नाही
पडलो तरी उठत राहीलो
रडलो तरी हसत राहीलो
जीवनाच्या या लपंडावामध्ये शेवटी मी जिंकलो
पण या सगळ्यांत मी खूप काही शिकलो
पण या सगळ्यांत मी खूप काही शिकलो
