शिकवण
शिकवण
पोरी लहानपणापासून जपलयं तुला हाताच्या फोडावाणी
थोडीशी जखम होता
आमच्या डोळ्यात येतं पाणी
संकट येता तुला कधी
दे आम्हाला जोराची हाक
पोरी
तू प्रत्येक पाऊल जपून टाक
शालेय जीवनात तुला
आमिषे दाखवतील कोणी
फसवतील तुला जागोजागी
बोलून गोड वाणी
दुधान तोंड भाजल्यावर
लोक पितात फूंकूनही ताक
पोरी
तू प्रत्येक पाऊल जपून टाक
काँलेज जीवनातही
भेटतील तुला अनेक
मैञिणी आणि मिञ
जाणून घे त्यांच्या भावना
त्यांच्या मनातील षडःयंञ
बळी जाऊ नकोस त्यांना
नाहीतर कापशील आमचं नाक
पोरी
तू प्रत्येक पाऊल जपून टाक
निर्भयासारखं संकट
येऊ शकते तुझ्यावर कधी
होऊन राणी झाशीची
त्यांच्याशी दोन हात कर आधी
शिलाचं कर रक्षण
करून दुश्मनाची राख
पोरी
तू प्रत्येक पाऊल जपून टाक
लग्न झाल्यावरही ठेव
सासरच्यांचा मानाप्रमाने मान
अपमान करू नकोस कोणाचा
सतत माहेरची वाढव शान
काही चुकांना क्षमा करून पदराखाली झाक
पोरी
तू प्रत्येक पाऊल जपून टाक
चुका झाल्यावर तुला बोलतीलही सासू अन् सासरा
तोंडी त्यांच्या लागू नकोस
तेच आहेत तुझ्या संसाराचा आसरा
संसाराचा गाडा तू अर्जूनाचा सारथी होऊन हाक
पोरी
तू प्रत्येक पाऊल जपून टाक
सासरचं करता करता
आयुष्य सरत जातं
सद्गुणांनी आपल्या ते
पुढे सासरच माहेर होतं
हुडपणा सोडून दे तू
वडीलधा-यांचा पाळ धाक
पोरी
तू प्रत्येक पाऊल जपून टाक
संसारामध्ये तू पुढे
एवढी रमून जाशील
आम्ही केलेल्या संस्काराची
फुले तेथे वाहशील
संसाररुपी गाड्याचे
कधी ढळू देऊ नको चाक
पोरी
तू प्रत्येक पाऊल जपून टाक
प्रेम,माया , ममतेने सासरचं बदलूनच टाक रूप
वेळोवेळी तुला संकटे
आडवे येतील खूप
मी म्हणत नाही तुला
तू कधी अन्यायापुढे वाक
पोरी
तू प्रत्येक पाऊल जपून टाक
