दिवा
दिवा
*जगाला मी प्रकाश दिला*
*जगाचा अंधार मी दूर केला*
*पण इतके करूनही*
*माझ्याखालील अंधार मला नाही घालवता आला*
*माझे सर्वस्व मी दुस-याला दिले*
*त्यांचे दु:ख मी घेतले*
*अंगात शेवटचा त्राण असेपर्यंत पुण्यच केले*
*म्हणूनच माझ्या वातीचा कोळसा झाला*
*पण इतके करूनही*
*माझ्याखालील अंधार मला नाही घालवता आला*
*माझ्याच प्रकाशात कोणी वकील*
*कोणी पोलीस ,डॉक्टर, इंजीनीयर*
*तर कोणी वैमानिक झाला*
*पण इतके करूनही*
*माझ्याखालील अंधार मला नाही घालवता आला.*
