STORYMIRROR

Raju udmale

Others

3  

Raju udmale

Others

शाळा हसली

शाळा हसली

1 min
345

लॉकडाऊनमध्ये ब-याच दिवस निरागस ओसाड पडलेली शाळाआणि तीचा परिसर स्वच्छ झालेला पाहून आज गुरुजी,बाईंना पाहून खडू,फळा,झाडे,अंगण,पंखे,झोके सारे आनंदात दिसली. सा-यांना आनंदात पाहून ब-याच दिवसांनी आज शाळा हसली


मार्च पासून माझी शाळा 

रुसून होती बसली

शाळेकडे मुले येताना पाहून

खुदकन गालात हसली


खोक्यातले खडू पण

आनंदाने उड्या मारू लागले

छताचे पंखे देखील आज

खुप दिवसांनी गरगरू लागले.


कुंड्यातील रोपेही

झोपेतून जागी झाली

जणू काही आज त्यांना

नविन पालवी आली


शाळेचे अंगणही आज 

खुप झाले वेडे

अंगणावरील छोटे छोटे

उड्या मारू लागले खडे


काळा फळा ही आज

खुदकन गालात हसला

कित्येक महीन्यांनी त्याचा

 जीवलग मित्र खडू त्याला भेटला.


शाळा म्हणाली " *आज माझं* 

*सारं दुखणं खरं संपलं*

*माझ्या लेकरांचं पाऊल*

*शाळेकडं येताना दिसलं*"


 आज गुरुजी,बाई, मुलांना पाहून

खडू,फळा,झाडे,अंगण,पंखे,झोके सारे आनंदात दिसली

सा-यांना आनंदात पाहून

 ब-याच दिवसांनी आज शाळा हसली


Rate this content
Log in