बाप
बाप
1 min
343
कितीही येवो संसारात
दुःखाच्या मोठाल्या लाटा
बाप मात्र शोधतो
त्यातूनही सुखाच्या वाटा
सर्वांच्या सुखासाठी
रात्रंदिवस कष्टत असतो
न पेलणार ओझं सुद्धा
पाठीवर घेऊन चालत असतो
घरातल्या कोणालाच
त्याचं दुःख कळत नसतं
आतल्याआत त्याचं मन
शेकोटी सारखं जळत असतं
बाप आपल्या दुःखाचं
कधीच भांडवल करत नाही
खूप काही बोलावसं वाटतं
पण काहीच बोलत नाही
सगळ्यांची मने जपताना
स्वतःचा जीव मारत असतो
त्यालाही एक मन आहे
हे कोणीच जाणत नसतो
