STORYMIRROR

Raju udmale

Abstract

3  

Raju udmale

Abstract

का ?

का ?

1 min
267

देवा मी पुर्वजन्मी

असा काय केला गुन्हा

म्हणून मला जन्म दिला

गरीबाघरीच पुन्हा

का.........?


आईबाप माझे दिवसभर

ढोरावाणी कष्ट करतात

तरीही आम्हांला खाऊ घालून ते माञ

कधीकधी उपाशी पोटीच झोपतात

का.........?


आमच्या गरीबिचा माञ

सगळेच उठवतात फायदा

अन्याय झाला गरीबावर तरीही

श्रीमंतीपुढेच झुकतो कायदा

का.........?


गरीबांच्या नावाने अनेक

योजना राबवल्या जातात

फायदा माञ योजनांचा

 वरिष्ठ लोकचं घेतात

का.........?


चारचौघातही गरीबीचीच

उडवली जाते थट्टा

श्रीमंताचा गुन्हा लपवून

गरीबालाच लावला जातो बट्टा

का.........?


परिस्थितीने गरीब म्हणून मोकाट

कुञ्यावाणी जीणं होतं

हाड म्हटलं की बिचारं

दुस-या घरी निघून जातं

का.........?


गरीबांसाठी पुन्हा येथे

माणूसकीची भिंत उभी केली

नव्या नाही तर तेथे

जुन्या कपड्यांचीच रेलचेल झाली

का........?


लग्नसमारंभात नको असतानाही

आत आग्रहाचे जेऊ घातले जाते

पण बाहेर गरीब भुकेल्याला

उपाशीपोटी हाकलून दिले जाते

का........?


श्रीमंतांचे मुसळाएवढे 

झाकून ठेवलं जातं

गरीबाचं कुसळाएवढही सा-या 

गावात दवंडी देऊन येतं

का........?


पैशापुढेच झुकती दुनिया

श्रीमंतीलाच कुठेही मान

प्रत्येकवेळी चारचौघात

गरीबीचाच होतो अपमान

का........?


पैशामागच पैसा पळतो

हेच 100% आहे खरं

म्हणतात गरीबाघरी जन्म घेण्यापेक्षा 

श्रीमंताघरचं कुञं झालेलं बरं

का........?


म्हणून म्हणतो देवा मी

काय केला होता मोठा गुन्हा

म्हणून मला गरीबाघरीच

का जन्म देतो पुन्हा पुन्हा?


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Abstract