मित्रास पत्र
मित्रास पत्र
पाऊस माझा आहे
जिवलग खरा मित्र
मित्र नात्याने वाटते
त्याला लिहावे एक पत्र
मित्रा एक गोष्ट मला
सांगायची आहे तुला
ती पूर्ण करशील
असे तू वचन दे मला
प्रत्येक वर्षी तू खेळतोस
कुठेतरी नवनवा खेळ
भावनांची कदर करत जा
वाईट येऊ देऊ नकोस वेळ
तुझ्या भेटीसाठी कित्येकजण
देवाला घालतात साकडं
तू असा कसा रे मित्रा
त्यांच्याशी वागतोस वाकडं
सांगली कोल्हापूर सारखे
करू नकोस परत कोणाचे हाल
होत्याचे नव्हते नव्हत्याचे होते
तू करून टाकलेस काल
त्यात कित्येकांनी घरदार तर
कित्येकांनी आपला जीव गमावला
असे वाईट कृत्य करून तू
कोणता नवा इतिहास घडवला?
मला तर असे वाटते
जिथे आहे गरज तेथेच तू धावावे
भुकेल्यांची भुक,तहाणल्यांची तहान
भागवून दु:ख त्यांचे तारावे
तू आलास तरी वेळेवर
आणि शांततेत ये
आनंदी,समाधानी करून सगळ्यांना
चांगले आशीर्वाद घे
पृथ्वीवरील कोणासही तू
कधी नाराज नको करूस
शेतकरी राजाच्या डोळ्यात
कधी पाणी नको आणूस
चार महिन्याचा पाहुणा तू
नको रे वागू असा
तुझ्या अशा वागण्याने
तुला मित्र तरी म्हणू कसा
शपथ आहे माझी तुला
तू असा वागणार नाहीस पुन्हा
माळीण, सांगली-कोल्हापूर यासारखा
परत करणार नाहीस गुन्हा
असे वागायचे नसेल
तर मैत्रीवर सोड पाणी
यापुढे नाही गाणार कधी मी
तुझ्यासाठी पावसाची गाणी
