का दिलीस लंबी यातना
का दिलीस लंबी यातना
हे परमात्मा तुझ्या प्रत्येक कठीण काळास कवटाळीले सदा
ह्या नयनांनी सदा स्विकारले तुला,
तरी का आज दिली आम्हांस ही लांबी यातना
आज कोणाशी लढू मी, सांग तू,
ह्या जगाशी, या तुझ्याशी बोल ना....
आता तुलाच ठरवायचे आहे, हे ईश्र्वरा,
काय मिटवायचे पहिलें सांग ना...
कुणाची भुक, या मिटवायचे या महामारीचे आजार तू बोल ना...
कां घरा निघाली ती इवली पावल अनवाणी
त्यांच्या पाऊल वाटेचा तो लांबच लांब सफर ....तू का थांबला?
कुचंबणा झाली या जिवाची, ती मी कुणाशी बोलु बोल ?
तूच चालक या विश्वाचा, सुटेल संकटातून हे जग, आहे विश्वास खोल
नको अंत पाहू जिवांचा , कोंडला हा प्राण
टाळे लागले मंदिरात, बंदीस्त का झाला देवा
परत फिरुनी येईल ते सुगीचे दिवस,
सण आनंदाने साजरे होतील,करु तुझ्या सेवा
नको रुष्ट होवू देवा...काय करणार
मी उघड्या डोळ्यांनी पाहत आहे घातपात
घे हाती त्रिशूळ आता शिवा
आणिक, उभा रहा तुझ्या साम्राज्यात,
