माझे बाबा
माझे बाबा
बाप हा बापच असतो
त्याचा एक धाक असतो ,,
इच्छाआकांक्षांना अंत नसतो
ते साकारण्यासाठी तो झटतो !!
बाप हा बापच असतो....
दिवसरात्र फक्त विचार
मुलांचे होवो स्वप्न साकार ,,
एका अद्भुत नगरी तला तो
बहु मूल्यवान आविष्कार !!
बाप हा बापच असतो....
विचारांचे पाणी गोडच असते
नारळ किती पण कठीण असू दे ,,
त्याच्या सम नाही कुणी जगी
मज देवा गुणांचे थेंब वेचू दे !!
बाप हा बापच असतो.....
आरशात मी सदा बघते
पण माझे प्रतिबिंब मला न रुचते ,,
कधी होईल मी त्यांच्या सम
आयुष्यभराचे मनी स्वप्न वसते !!
बाप हा बापच असतो.....
योग्यता माझी तिळभर नाही
माझी काव्य सुमने त्यांना वाही ,,
मी रेखाटलेले त्यांचे चित्र
माझे नयन भरभरून पाही !!
