STORYMIRROR

sarika k Aiwale

Tragedy

3  

sarika k Aiwale

Tragedy

तू आहेस ना

तू आहेस ना

1 min
268

येईल का पुन्हा ती पहाट सोनेरी 

नकोच ती आशा मन दुखवणारी 

सावर रे मना नको ती वाट विषारी 

का अशी खेळते तू या जीवनाशी 


नवी सकाळ येईल ही तुझी नसेल ती 

पापणीत स्वाप्नांत पाहिला सल नको ती

जाणिवा नकोच ठेवू कोणत्या हृदयी तू 

वाट अंधारली नशीबी का खेळ मांडला तू


येणार्या प्रत्येक क्षणाला थांबून विचार तू 

असशील का तू त्या वळणावर का नाही 

अशी आसुयेत नको छळ आता मानाचा 

मन तरी कुठे उरले त्या भावना जपयला


तू आहेस ना त्या वळणावरीअजुनी 

नजरेतुनी झेपावते मन कडा ओलंडूनी 

तू असशील तर हे क्षितिज ही पैलतीर 

तू नाहिस हे सत्य कितिदा सांगाव मी 


तू आहेस का हेच विचारत मन पुन्हा पुन्हा 

तू नाहीस याची ग्वाही देते ही साध्या उगा 

क्षण क्षण गुंतले श्वासात गुंगले मी ही जराशी 

काळ होता पुढे खोल होती ती नात्याची दरी 


तू आहेस ना दिला हात झोकुनी मी ही 

तू नाहीस ना संगितले वारयाने देत झोका 

होता तू ही तिथेच नंतर मला जाणवले 

संवेदनाच्या खोलदरीत मला तूच तर झोकुनी दिले 


तरिही मन अशन्कीत तू आहेस ना माझा 

तू नाहीस हे नशीब सांगत पुन्हा पुन्हा मला 

पाठशिवणीचा हा खेळ नित्याचं झाला 

मन अन् नशीब यात शंका काही मिटेना?


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Tragedy