STORYMIRROR

Sakharam Aachrekar

Tragedy

3  

Sakharam Aachrekar

Tragedy

आजार सावल्यांचा

आजार सावल्यांचा

1 min
225

तुझ्या त्या हासण्याचा, मनावर वार होतो 

उरी या आसवांचा, उगा अंधार होतो


कुठे तू दूर केले, कसा मी दूर गेलो 

निसटत्या सांजवेळी, मनी बेजार होतो 


नभी हे चांदणे का, रया देई तमाला

मला त्या सावल्यांचा, फुका आजार होतो 


पुन्हा घे हात हाती, सवे जाऊत दोघे 

कधी गे एकट्याला, इथे पै पार होतो 


तुझे आले बहाणे, कशाला भेटताना 

जुन्या सार्‍या स्मृतींचा, उभा गंधार होतो


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Tragedy