STORYMIRROR

Pandit Warade

Tragedy

3  

Pandit Warade

Tragedy

जीवनदीप

जीवनदीप

1 min
187

आईबापाच्या डोळ्यामध्ये नकोस देऊ पाणी

घडू शकते तुझ्याही जीवनी अशीच कर्म कहाणी ।।धृ।।


वागविले तुज नऊ महिने आपुल्या उदरामध्ये

त्याच आईला जागा नसावी तुझ्या रे घरामध्ये

दूध नव्हे तिने रक्त पाजले गेला का विसरुनी ।।१।।


बालपणी होतास करत तू तिचे अंथरून ओले

आजही तिचे तुझ्याच साठी भरून येती डोळे

काटा मोडता तव पायामध्ये तिच्याच नयनी पाणी ।।२।।


बाप तुझा रे किती कष्टला ऊन पावसामध्ये

तुझ्याच साठी राब राबला उभ्या आयुष्यामध्ये

त्याच बापाची गत आज का झाली रे दीनवाणी ।।३।।


घास सुखाचा तुला भरवण्या किती त्यांची धडपड

उदरभरणही आज तयांचे झाले तुला का जड

आयुष्याच्या संध्या समयी धाडीसी वृद्धाश्रमी ।।४।।


आईबाप हे देव देवता तुझ्याच असता घरी

वणवण फिरसी उगाच का मग जगाच्या बाजारी

जन्मभराच्या उपकाराला जाशी का विसरुनी ।।५।।


दीप होऊनि जीवनपथावर प्रकाश त्यांना देई

कृतज्ञतेने सेवा करणे हीच खरी पुण्याई

ऐक *पंडिता* ध्यानी घेई साधुसंतांची वाणी ।।६।।


Rate this content
Log in

Similar marathi poem from Tragedy