STORYMIRROR

vidya,s world

Tragedy

3  

vidya,s world

Tragedy

जीवन हसत जगावच लागत ..

जीवन हसत जगावच लागत ..

1 min
267

जीवन असल कितीही खडतर

तरी ते हसत जगावच लागत

काट्यासोबत ही फुलाला

फुलावच लागतं

अपयश आलं म्हणून का

खचून जायचं असत?

यशाच्या आशेने पुन्हा

धडपडावच लागत

जीवन असल कितीही खडतर

तरी ते हसत जगावच लागत

नाही आले सुखाचे क्षण

म्हणून का दुःखाला कुरवाळत

बसायचं असत?

सुखा साठी च पुन्हा पुन्हा

झगडावं लागत

नाही मिळालं हवं ते

म्हणून का जगणं सोडायचं असत?

पुन्हा नवीन वाटेवर पाऊल

ठेवावच लागत

जीवन असल कितीही खडतर

तरी ते हसत जगावं च लागत

दिल्या आपल्या नीच जखमा

म्हणून का नात तोडायच असत?

जखमेलाच आधार बनवून

जीवन हसत जगावंच लागत..


Rate this content
Log in

Similar marathi poem from Tragedy