Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Priya Toraskar

Tragedy Inspirational

4.5  

Priya Toraskar

Tragedy Inspirational

गौरी व्हावी पुन्हा दुर्गा

गौरी व्हावी पुन्हा दुर्गा

1 min
402


मीच गौरी मीच दुर्गा, रूप एक जरी विविध स्वरूपा.


मीच सुता अन् मीच कांता, मीच भगिनी मीच माता


चिमुकली ती अल्लड तनया, बालपणीची मुक्त बालिका 


भावा बहिणीची अतुट माया, मीच द्रोपदी,मीच सुभद्रा.


स्वप्नपरी मी, मीच मुग्ध प्रेमिका, मुरलीधर कृष्णाची मीच राधिका.


पतिव्रता मी, प्रेमळ भार्या, मीच अनुसूया, मीच अहिल्या


सुशील, शालीन मीच स्नुषा, मीच गृहलक्ष्मी, मीच अन्नपुर्णा


वात्सल्यमुर्ती मी, मीच ममता, मीच देवकी,मीच यशोदा


प्रेमळ गौरी, तापट दुर्गा, जन्म एक तरी अनेक भूमिका 


शक्तिरूप मी, असुर मर्दना, मीच भवानी, मी जगदंबा


भक्तिरूप मी, भोळी भाविका, मीच शबरी, मीच मीरा


राष्ट्ररूप मी, राष्ट्र रक्षिका, मीच जिजा, मीच मनःकर्णिका


कलियुगात या विपरीत घडले, माझे वैभव जरा न उरले


मोल न उरले मनास माझ्या, उरली नुसती मोहक काया.


जन्माआधीच मरण सोहळा, मी अनुभवला माझ्या डोळा


सर्व जाणीवा बोथट झाल्या, मीच 'नकोशी', मीच 'निर्भया'


दैवयोग का असा मिळावा? की गतजन्मीचा दावा फेडावा?


पुसून आसवे ओघळणारी, दाखवून दे अवघ्या जगताला


जरी मी नारी, नाही मी अबला, मी तर समर्थ, सक्षम सबला.


आशीर्वच हा मज देगा देवा,


गौरी व्हावी पुन्हा दुर्गा, गौरी व्हावी पुन्हा दुर्गा.


Rate this content
Log in

Similar marathi poem from Tragedy