Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Priya Toraskar

Romance

4.6  

Priya Toraskar

Romance

तुझी नि माझी रेशीमगाठ

तुझी नि माझी रेशीमगाठ

1 min
322


मला तुझी नि तुला माझी साथ ,

तुझी नि माझी रेशीमगाठ .


कोण कोठले अनोळखी आपण ,

अचानकपणे कसे भेटलो तरीपण.

काय न उमगे याचे कारण,

ओळखीचे हे अनोळखीपण .


भाव तरळले मनी अकल्पित ,

ओढ दाटली गुढ अनामिक.

स्मित उमटले गोड गाली ,

मंद सुगंधित हवा झाली .


हवेहवेसे नाते आपले ,

हळुवार पणे उमलत गेले .

सरले वाटे आपले शैशव ,

तारुण्याची होता जाणीव .


प्रेमाला मिळाली प्रेमाची साद ,

तुझी नि माझी रेशीमगाठ ।


पूर्ण झाले विवाह बंधन ,

एकच झाले आपले जीवन .

जोडत गेलो नाती गोती ,

मित्र परिवार अन् सखे सोबती .


स्वर्ग सुखाची झाली प्राप्ती ,

आई -बाबा मिळता उक्ती .

दिवसां मागून दिवस सरले ,

नाते आपले बहरत गेले .


मनाची मनाला पटली खूणगाठ , 

तुझी नि माझी रेशीमगाठ .


चिमणी पाखरे जातील दूरवर ,

नसेल तेव्हा जरी कुणी बरोबर ,

आपली राहिल पक्की साथ ,

तुझी नि माझी रेशीमगाठ .


श्वासात राहील जोवर श्वास ,

एकमेकांवर दृढ विश्वास .

मी पंच्चावन्न जरी आणि तु साठ ,

थरथरत्या हातानी घे हाती हात .


मला तुझी नि तुला माझी साथ ,

तुझी नि माझी रेशीमगाठ !!!



Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance