Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Priya Toraskar

Tragedy

2  

Priya Toraskar

Tragedy

तू थांब जराशी

तू थांब जराशी

1 min
50


उभा ठाकला पुढे काळ , तर म्हणेन मी त्यासी

अजुन वेळ आहे मला , तू थांब जराशी


परतून माघारी जिने आणले सत्यवानासी ,

तिनेच तुझ्या सोबत कसे यावे ,सोडून अर्ध्या संसारासी .


आई-बाप सासू-सासरे माझे , माझ्या पाठीशी

थोडे मोठे अजुन होऊदे , माझ्या पिल्लासी .


ना छळीले ना वदले कोणा कडव्या बोलासी ,

अहित कुणाचे कधीच चिंतिले ना मी कधी मानसी,


जमेल तेव्हा नेहमी दिला मी हात मदतीसी .

दैव तरी मग आले का हे माझ्या भोगासी ?


सांग कुणाकडे मागु उत्तर, या माझ्या प्रश्नासी ?

हे परमेश्र्वरा, दाखवी आता, तूच चमत्कारासी .


भावासारखा राहशील उभा ना माझ्या पाठीशी ?

थोडा अवधी अजुन देशील का या तुझ्या बहिणीशी ?


नक्कीच असेल पुण्य एवढे माझ्या पदरासी ,

एकवार तरी मान्य करावे माझ्या विनंतीसी .


नको हक्क मज ना हव्यास कशाचा , नको धनाच्या राशी ,

पार पडू दे माझ्या हातून माझ्या कर्तव्यासी .


हसत हसत मग निरोप धाडीन तुला , मीच एके दिवशी ,

आनंदाने खुशाल ने मग मला तुझ्या सदनासी .


पण , अजुन वेळ आहे मला , तू थांब जराशी !!!

तू थांब जराशी !!!


Rate this content
Log in

Similar marathi poem from Tragedy