STORYMIRROR

Priya Toraskar

Classics

4  

Priya Toraskar

Classics

वंदन तुजला देवी सरस्वती

वंदन तुजला देवी सरस्वती

1 min
461

ll श्री ॥


वंदन तुजला देवी सरस्वती।

लाभु दे सकलांना शुभमती ॥


दिव्य कांती, तेजप्रभा लोचनी

हास्य मधुर हे तव शुभ वदनी ,


शुभ्र वस्त्र परिधान करूनी

गळा माळ अन् करी कुमुदिनी ,


हाती पुस्तक , वीणा धरूनी

विराजीत होसी तू मयूरासनी ,


विद्यारंभी नमितो तुजला , हे देवी भगवती|

लाभु दे सकलांना शुभमती ॥१ ॥


जगन्माता तू , तूच वाग्देवता , तू चैतन्यमूर्ती

तव गुण गाया तुझ्या लेकरां दे आता स्फूर्ति ।


अज्ञानाचा तम हरोनी, लाभु दे ज्ञानाची संगती ,

आशिष शुभंकर तुझा राहु दे सदा आम्हावरती । 


प्रेमभाव या मनी रुजावा ,दूजाभाव ना कधी वसावा,

हीच प्रार्थना तुझ्या चरणी, हे देवी भगवती ।

लाभु दे सकलांना शुभमती ॥२ ॥


वंदन तुजला देवी सरस्वती , हे देवी भगवती ।

लाभु दे सकलांना शुभमती ॥


Rate this content
Log in

Similar marathi poem from Classics