STORYMIRROR

Manisha Patwardhan

Tragedy

3  

Manisha Patwardhan

Tragedy

बोलीभाषा

बोलीभाषा

1 min
152

सकु घरामंदी 

आली आनी

पोरां.....

बाय आली

बाय आली

म्हनुन शान

 वरडाया लागली

बायच्या हाता मंधल्या

गठुल्या संग

झोंबाया लागली....


गठुल्यात तर

कायबी नवता..

बगुन पोरांचा त्वांड

कसनुस व्हता

येका पोरान

इचारलाच....

बाय खाया ????


प्वाटातल्या

कावल्यानी

बोंब उटवलेली...

अंगातल्या पान्यानी

वली झालेली

बाय....

वस्सकनी अंगावर

प्वोरांच्या वरडली

आवशीची हाडूक

खावा म्हनली

पोरांची त्वांडे मगे

गपगार पडली

गुमान भाईर

खेलायला गेली...


तीचा त्वांड मातुर

कसानुसा झाला

पोरांनला खिमाट 

करूनशान घातलान

आंजारलान...

आन् गोंजारलान बी


तेवड्यात दादला

डुलत डूलत

घरामंदी आला

पाय तेचा येतांना

शेनात पडला

सकूच्या पेकाटात

चार लाता घातल्यांन

अन् धडुत्यावर पडून

घोराया बी लागला


दादल्याला तीन पन

चार शिया घातल्या

पोटाला थ्वोडा 

पानी पिवून

धडूत्यावर स्वोताला

झोकुन दिल्यान..

पर डोल्याला डोला तिचा

काय लागलाच नाय...


Rate this content
Log in

Similar marathi poem from Tragedy