Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Manisha Patwardhan

Comedy

4  

Manisha Patwardhan

Comedy

भुपाळी

भुपाळी

1 min
280


उंच इमारतीच्या मागे , सूर्य उठला ग बाई

आज माझ्या पाडसाला , जाग कां ग येत नाही  ।। धृ ।।


आई उठली घरात , पेपर येई दारात

शाळेचीही बेल आता , वाजेल क्षणात

उठ उठ सोन्या आता , गाते तुला मी भुपाळी   ।। १ ।।


रिकामी मी नाही कधी , गाठायची ना मला गाडी

तुझ्या डब्या साठी बाळा , बाई करतील भाजी पोळी

आजची ही आहे ममता , आजचीच ही भुपाळी  ।। २ ।।


संध्याकाळी घरी येता , मोबाईल माझ्या हाती

वेळ नसे मुळी मला , कशी गाऊ मी रे गाणी

नको त्रास देऊ आता , बोलू आपण कधीकाळी  ।। ३ ।।


Rate this content
Log in

Similar marathi poem from Comedy