आई ही आईच असते
आई ही आईच असते


आई ही आईच असते
तिच्या समोर हात जोडून कोणताच नवस बोलायची गरज नसते. मनातल्या विचारांचा ती आरसा असते, त्या आरशात निरखून बघायची आपल्याला गरज नसते.
मायेच्या पावसाचा ओलावा ती आई असते,
रणरणत्या संकटातही सावली ती आई असते
चुकीला शिक्षा देणारी ती आई असते,
आवडीचा पदार्थ बाजूला काढून हळूच
आपल्या वाटणीचा वाटा ही,
आपल्यासमोर सरकवणारी
ती आई असते.
रात्री आपल्याबरोबर जागरणं करणारी आई असते,
काही गोष्टी नसांगताही तिला समजणारी ती
आई असते.
आपल्या लेकराच्या एखाद्या यशाचं श्रेय देवाला
देऊन चिमुटभर साखरेचा नैवेद्य दाखवणारी
आई असते.
ऊज्वल भविष्यासाठी गगनात झेप
घेणाऱ्या पिलांच्या पंखात बळ देणारी ती
आई असते.
पिलू घरट्यातून उडून जाताना त्याच्या.
विरहानं पापणीच्या आत अश्रु
दडवणारी ती ही एक आई असते.
परदेशी गेलेल्या लेकराच्या वेळेनुसार
फोन घेऊन त्याच्या फोनची वाट पा
हणारी
ती ही एक आईच असते.
मुलांच्या सुखदुःखात सुख मुलांच्या ओटीत व
दु:ख माझ्या पदरात टाक हे देवाला अर्वजून सांगणारी
ती ही एक आईच असते.
अशी हि वेगवेगळ्यारूपातआपल्या समोर येते,
प्रत्येकाची आई हि आईच असते,
प्रेमाची पध्दत थोडी वेगळी असते.
पण तिच्याकडे बघायची द्दष्टी आपली मात्र निराळी असते.
ज्याला तीच्या प्रेमाची महती समजते
त्याची आई शेवटपर्यंत त्याच्या समवेतच राहते.
नाहितर शेवटी शेवटच्या अंतहीन प्रवासात ती.
एकटी होते आणि वृध्दाश्रमातच्या पायरीवर मुलांच्या वाटेकडे डोळे लावून,
हातातल्या फोन वर नजर ठेवून बसलेली दिसते. हि आई यातलीच एक आई असते.
मग या शेवटच्या प्रवासात ती कोठे चुकलेली आई असते?
वात्सल्याने भरलेली प्रेमाची पुंजी का तीची हरवलेली असते?
का कोणी हिसकावून घेतलेली असते? का तिच कोठे चुकलेली असते? का तिच कोठे चुकलेली असते.
खरच मग हि कोणती आई असते,? मग हि कोणती आई असते??.