STORYMIRROR

Manisha Madavi

Romance Inspirational Others

3  

Manisha Madavi

Romance Inspirational Others

स्त्री कालची आजची आणि उद्याची

स्त्री कालची आजची आणि उद्याची

1 min
365

उंबरठयाच्या आत स्त्रीचे जीवन

का मर्यादित असते

लोकं हे का विसरतात

तिलाहि जगण्याचा अधिकार असते

सारी दुःख साऱ्या व्यथा

तिच्याच पदरी का पडावी

दोष तिचा नसतानाही

तिलाच दूषणे का द्यावी

तेहतीस टक्के आरक्षित असूनही

ती बंधनातच राहील

कालची,आजची आणि उद्याची

स्त्री ही सारखीच राहील

पूर्वीपासून स्त्रीची

अग्निपरीक्षा होत आहे

'सीता' नाही सुटली तर

आजची स्त्री के सुटणार आहे?


Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance