STORYMIRROR

Manisha Madavi

Romance Tragedy Children

3  

Manisha Madavi

Romance Tragedy Children

अंतर

अंतर

1 min
240

अंतर दोन पिढीतील

सहज कळून जाते

हातावरील सुरकुत्या

काहीतरी सांगून जाते

थरथरला हात जरी

उमेद नवीन आहे

संकटांना पेलण्याची

पुन्हा तयारी आहे

कणखरपणा तेव्हाचा

आताही भरला आहे

पण वार्धक्याचा हा पडदा

आज आडवा आला आहे

असली जरी हाती काठी

पण हात तेच आहे

आताही या शरीरात

सळसळतं रक्त आहे

अंतर दोघांच्या वयातील

जरी वेगळे आहे

लोकांना जोडून ठेवण्याची

तीच कला अंगी आहे


Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance