असे जगावे
असे जगावे
असे जगावे आपण
सर्वांनी आपल्याकडे बघून जगावं
कितीही दुःख असले तरीही
नेहमी खळखळून हसावं
असे जगावे आपण
जशी वाहती नदी
सर्वाना आपल्यात सामावून
वाहते नेहमी स्वच्छंदी
असे जगावे आपण
जसा वाहता वारा
जीवनातल्या कुठल्याच दुःखाला
नसेल कुठेही थारा
असे जगावे आपण
जसा रिमझिम पाऊस बरसणारा
थोड्यावेळासाठी येऊन
मनाला कायमचं सुखावणारा
असे जगावे आपण
जसे रंगीबेरंगी सुंदर फ़ुले
त्यांना बघताच सर्वांच्या
ओठांवर हास्य खुले

