फक्त लढ म्हणा
फक्त लढ म्हणा
संस्काराची शिदोरी घेऊन
सासरी तुम्ही पाठवलं
छळ कितीही केला तरीही
ना तोंड कधी उघडलं
संस्काराचा हा पडदा बाजूला घे म्हणा
आता फक्त लढ म्हणा
वासनेचे पुजारी आहे
बसले रस्त्या-रस्त्यावरी
पूर्ण झाकले तरीही
असते नजर उघड्या अंगावरी
भिऊ नकोस तू
हाती तलावात घे म्हणा
आता फ़क्त लढ म्हणा
गर्भातच मज मारू नका
जगण्याची एक संधी द्या
नसेल जरी मी वंशाचा दिवा
स्वप्नांना माझ्या फुलू द्या
आतल्या आत तू रडू नकोस
जरा तू हस म्हणा
आता फक्त लढ म्हणा
आता फक्त लढ म्हणा
