STORYMIRROR

Manisha Madavi

Romance Inspirational Others

3  

Manisha Madavi

Romance Inspirational Others

स्वतःच्याच प्रेमात

स्वतःच्याच प्रेमात

1 min
226

स्वतःच्याच प्रेमात

कधीतरी पडावे

आरशात निरखून

हळूच लाजावे

लाजेची लाली

आणावी गाली

नेसावी साडी

सुंदरवाली

केस मोकळे करून

जरा उडवावे हवेत

स्वतःलाच घ्यावे

हळूच कवेत

कॉफीचा कप घेऊन

बसावे गॅलरीत

रमावे कधीतरी

स्वतःच्याच आठवणीत

दिवसाही कधी कधी

स्वप्न पाहावे

स्वतःच्याच प्रेमात

कधीतरी पडावे


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Romance