STORYMIRROR

Manisha Madavi

Romance Inspirational

3  

Manisha Madavi

Romance Inspirational

रंग उधळू या आनंदाचे

रंग उधळू या आनंदाचे

1 min
250

मिटवू या मना-मनातील अंतर

स्वागत करू या रंगांचे

सण आला होळीचा

रंग उधळू या आनंदाचे

केशरी फुलांनी पळस नटला

दारी तोरण पानांचे

आकर्षक रांगोळी सजली

वाढवी सौंदर्य अंगणाचे

पुरणपोळीचा स्वाद जिभेवर

तुपाचा मोहक सुगंध

रंग गुलाबी, पिवळा, निळा

मनास करी बेधुंद

जाळुनी राग, द्वेष, मत्सर

दहन करू होलिकाचे

घेऊनिया हात हाती

रंग उधळू या आनंदाचे

माणुसकीच्या रंगामध्ये

सारे आज रंगू या

रंगुनी प्रेमाच्या रंगात

स्वप्न उद्याचे पाहू या


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Romance