पाऊलखुणा
पाऊलखुणा
**************
तुझ्या पाऊलखुणा पडत गेल्या
त्या वाटेवरून मी चालतं आलो
तुझ्या मागे मागे येताना
मी हरवत गेलो
दूरवर होतीस तू
दिसत नव्हते काही
अवघड होते आणखी चालत येणे पायी
किती वळणे घ्यावीत
पावलांनाही कळत नव्हते
तुद्या मागे मागे यायला
पळता येत नव्हते
तुझ्यासाठीच तर मी धावत होतो
माझ्यासाठी तू थांबत नव्हती
माझ्या व्यथेवर तू गं
लांब उभी राहून हसत होती
तुझं असं वागण्याच
मला काही कळायचं नाही
तुझ्या माझ्या मधल अतंर
कमी व्हायच नाही
मी चालत होतो मागे मागे
तू वळून पाहत नव्हती
माझ्या जखमी झाल्या पावलांना
तू फुकंर घालत नव्हती
तेव्हा वाट तुझी सोडुन
मी माझ्या वाटेवर निघालो
तुझ्या वाटेवरच्या
माझ्या पाऊलखुणा पुसत गेलो

