तूच आहेस..
तूच आहेस..
तुझ्यापासून सुरु अन् शेवटही तूच
असे हे माझे जीवन आहे
दरवळणाऱ्या फुलांचा सुगंधही
तुझ्यापेक्षा कमीच आहे
विसरणे शक्य नाही तुला
कारण माझा देवही तूच आहे
मिळालं जीवनात सार काही
एक फक्त तुझी कमी आहे
डोळे उघडता क्षणी चेहरा तुझा दिसावा
आता हे एकच मागणे आहे
आठवत नाही मला पहिली इच्छा
पण माझी अंतिम इच्छा तूच आहे..