आयुष्य हे असं का असतं?
आयुष्य हे असं का असतं?
कोणी सांगेल का आयुष्य हे असं का असतं
जे हवंय ते कधीच सहज मिळत नसतं
जे नकोय ते मात्र आपल्या पुढ्यातच असत
सुख हवं असलं तरी दुःख न मागता मिळत असत
कितीही दुखावलं त्या मनाने तरी हसावं लागत
क्षणात सारं काही विसरून पुढे जावं लागतं
जे नशिबात असेल तेच घडत असतं
क्षणिक सुखावर दुःखाच विरजण तयारच असतं
जेव्हा जगणं नकोस वाटत तेव्हा काळ संपत नाही
जेव्हा जगण्याचा अर्थ कळतो तेव्हा वेळ संपलेली असते
म्हणतात अशक्य अस जगात काहीच नसत
पण ज्याची ओढ असते तेच नशिबाला मान्य नसतं
