याड लावलं
याड लावलं
तुझ्या पिरतीन आज मला याड लावलं
माझं मलाच कळना कसं भान हरल
माझ्या काळजाची तार अशी छेडलीस तू
तुझ्या ग्वाड हसण्यानच माझं पोट भरलं
तुझ्या नजरेनं उरामधी वार भरलं
मन मारून जगणं आता सार सरल
मनामधी पावसाच्या सरी बरसू लागल्या
तुझं माझं सुख दुःख आता एक जाहल..

