STORYMIRROR

Ratnadeep Sawant

Romance

4  

Ratnadeep Sawant

Romance

छत्री

छत्री

1 min
278

थंड थंड गारवा आणि हिरवं रान दाटल होत

हे दृश्य जणू मी खिडकीतून पाहिलं होतं

मन म्हणत होत बाहेर फिरून येऊ

पण तेच सांगत होत एकटीच नको जाऊ

त्या नजरेतून मी त्याला शोधत होते

बाहेर पाऊस पडत होता 

पण मनातच मी भिजत होते

खूप शोधलं त्याला पण तो

खूप दिवस नव्हता दिसला

होता मनात,  पण प्रत्यक्ष नव्हता भेटला

हाच तो सोसाट्याचा वारा आहे ज्यात

मी त्याच्या सोबत फिरायचे

उतुंग वाहत असला की

जवळ त्याला घ्यायचे

कधीतरी वारा आम्हाला दोघांनाही

खूप त्रास द्यायचा

माझा तोल जातोय म्हटल्यावर

लगेच मला हा सावरायचा

माहीत नाही मला तो

आता कुठे असेल

पण पाऊस बाहेर पडतोय

म्हटल्यावर नक्कीच

त्याला माझी आठवण आली असेल


                         

                         


Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance