शब्दांचे खेळ
शब्दांचे खेळ
एक स्वप्न दिवसाचं रात्र जागी करतं
रात्रीच्या उजेडात चांदण काळोख करतं
विहिरीच्या काठावर मन पोहून येतं
नदीवरच्या डोहात हृदय उडी मारतं
पावसाच्या सरीनं सडा फुलून जातो
सात रंगांच्या मैफिलीत इंद्रधनू रंग उधळतो
संध्याकाळच्या अवधीत सूर्य आंघोळ करतो
सकाळच्या पाऱ्यात चंद्र किरण पाडतो
शब्दांच्या या खेळात जो तो रमून जातो
मग आयुष्याच्या शर्यतीत का मागे पडतो
