कल्पना
कल्पना
पाऊस पडत होता मी छत्री विसरलो
समोर तुला बघत भिजत पाहत राहिलो
एक नजर दिली तेव्हा तु पण बघितलंस
हलकीच कळी फिरवत नजरेनं हरवलंस
पुढे गेलो तेव्हा कडाडत विज चमकली
तुझ्या मनातली भीती मला येऊन बिलगली
पावसात बेधुंद होऊन मन आपली भिजली
तु सोबत आहेस मी फक्त कल्पना केली

