विवाह हेच कारण
विवाह हेच कारण
उद्या माझं आडनाव
तुझं नाव असेल
उद्यापासून माझं गाव
तुझं गाव असेल || 0 ||
उद्या आपण एकमेकांची
ओळख करू धारण
आणि असं घडायला
विवाह हेच कारण
उद्यापासून एकांताला
मज्जाव असेल
उद्यापासून माझं गाव
तुझं गाव असेल || 1 ||
घरची लक्ष्मी बनून उद्या
येशील तू घरी
माझ्यासाठी आहेस तू
स्वर्गातली परी
माझी किंमत कमी आणि
तूला भाव असेल
उद्यापासून माझं गाव
तुझं गाव असेल || 2 ||
उद्या किती नवी नाती
वाट तुझी पाहतील
हॉल ते घरपर्यंत तुझ्या
प्रतीक्षेत राहतील
तुझ्या हाती सत्ता आणि
तूला वाव असेल
उद्यापासून माझं गाव
तुझं गाव असेल || 3 ||
नशीब तुझं नशिबाला
माझ्या तू जोडून
आणशील तू घरी
सुखसमृद्धी ओढून
तुझ्या पायगुणाचा
शुभ प्रभाव असेल
उद्यापासून माझं गाव
तुझं गाव असेल || 4 ||

