STORYMIRROR

vaibhav gidde

Romance

3  

vaibhav gidde

Romance

प्रेम कधीच विकत मिळत नसतं...

प्रेम कधीच विकत मिळत नसतं...

1 min
261

दिसत तसं कधीच नसतं

म्हणूनच जग फसत असतं

प्रेम हे शोधल्याने नाही तर

प्रेम हे वाटल्याने मिळत असतं..


प्रेमाला नसतो कोणता आकार उकार

कोणतं मोजमापही नसतं

असू दे कोणतही नातं

प्रत्येक बंधात ते दडलेलं असतं


प्रेमाला नसते कोणती भाषा

प्रेम हे निःशब्द असतं

क्षणभरात संपणार प्रेम

हे कधीच प्रेम नसतं


राधाकृष्णाचं असो किंवा बाजीराव मस्तानीच

प्रेम कधीच कोणापुढे झुकत नसतं

कदर करा नेहमीच नात्यांची कारण

प्रेम हे कधीच विकत मिळत नसतं


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Romance