नातं
नातं
नातं हे पतंग आणि मांजासारखं असावं
असेल सोबत तर उंच आकाशात जावं
कितीही संकटं आली तरी गोते खात राहावं
काटून दोर संकटांचा स्वच्छंद उडत राहावं
कितीही ताणलं गेलं तरी न सुटणार असावं
कितीही वर गेलं तरी परत जमिनीवर घेता यावं

