भूमिपुत्र
भूमिपुत्र
तूच मान तूच सन्मान
या देशाचा तू अभिमान
जिंदगी करुनी कुर्बान
राखितो या वतनाची शान
या धरतीची तुला आस
दुश्मनाच्या रक्ताची तुला प्यास
असे तू जेव्हा रणांगणी
ओठी अडतो आईबापाचा घास
वाहुनी तुझा हर एक श्वास
करितो काफिरांपासून रक्षण
प्राणाहूनही प्रिय असे तुला
तिरंग्याचे हे कफन
अशा या भूमिपुत्राला शत शत नमन..