धर्मवीर
धर्मवीर
शिवसुता काय ते तुझे शौर्य आणि काय ती यशो गाथा
तुझ्या जन्माने उजळून गेला या सह्याद्रीचा माथा
गनिमांचा कर्दनकाळ जणू तो एक लाव्हाच होता
वाघाच्या जबड्यात हात घालून दात मोजणारा एकच छावा होता
मृत्यूलाही जिंकणारा असा अजिंक्य योद्धा होता
महापराक्रमी महाप्रतापी असा धर्मवीर शंभू राजा होता
