काळ आणि वेळ
काळ आणि वेळ
स्वप्नातली कळी आज खुलणार होती
कधी काळी कोमेजलेली आज फुलणार होती
मन मारून जगणारी आज मनसोक्त हसणार होती
अपूर्ण अशी ती आज पूर्णत्वाला जाणार होती
तिच्या सख्याला आज ती भेटणार होती
त्या क्षणाची आतुरतेने ती वाटही बघत होती
पण नियतीला कदाचित त्यांची भेट मान्य नव्हती
नेहमी प्रमाणे नभ झाकून आले अन् सरी बरसल्या
आता तो काळ आणि वेळही निघून गेली होती
आशा निराशाच्या ह्या खेळात जगण्याची एक उमेद होती
कोमेजलेली कळी उद्या तरी फुलेल हीच एक आस होती

