प्रीत
प्रीत
गुंतले श्वास एकमेकात
तोल जरा सावरू दे आज
प्रीत माझी तूच प्रिया सखे
चांदण रातीला चंद्राचा साज...
ओंजळीत झाकला चेहरा तुझा
पाहून ह्रदयी झंकार छेडली
पाव्यातील सप्त सुरांनी छान
प्रीतीची गीतेधुंदीत गायीली.....
पुनवेच्या या बेधुंद रातीला
सोबत सखी आहे साथीला
दोघांचा प्रणय सुरू जाहला
शीतल चांदव्यात फुललेला....
सजणीच्या रित्या खांद्यावर
सजणा मस्त विसावला
बघा पुनव चांदण्या रातीला
मधाळ प्रीतीत मदन सुखावला...

