कृष्णरुप प्रेमाचे
कृष्णरुप प्रेमाचे
निळ्या सावळ्या आभाळी
निलवर्ण कृष्णरूप भासले
जलधारांचा रेशिमस्पर्श
अंग अंग गोरे भिजले....
थेंब थेंब चंदेरी चमचम
केसावरती मोती माळले
पाऊसपाणी अंगावरती
हलकेसे मोरपिस फिरले....
जलधारांचे सुमधुर संगीत
हृदय राधेचे कृष्णप्रीतीने भारले
कृष्ण अधरावरुनी वेणू रंध्रातूनी
जलधारेचे अमृत राधेने प्राशिले....
मेघरुप,पाऊसधारा सूर स्वर्गिय
विरहात विश्वभान विसरले
राधा ही बावरी कशी ही
चराचरात कृष्णरुप भासू लागले....

