STORYMIRROR

Meena Khond

Inspirational Others

2  

Meena Khond

Inspirational Others

नववर्ष शुभेच्छा

नववर्ष शुभेच्छा

1 min
31

पुष्पगुच्छ, शुभेच्छा नववर्ष

नववर्षाची सुंदर स्नेहभेट सहर्ष


फुलांचे विविध रंग रंग

मंद मंद मदीर धुंद सुगंध


परिमळ मधूर आंतरमनात

धुंद मंद सुगंध श्वासाश्वासात


सुकलेली कधितरी फुलेही पुस्तकात

हळव्या आठवणी हृदयी जपतात


खूप कांही सांगून जातात

खूप कांही देऊन जातात


नवे संदर्भ अर्थवाही जीवनात

नवी दृष्टी नवे संकल्प नव वर्षात


नवा प्रकाश सोनेरी रुपेरी

उधाण मनाची उंच भरारी


शिंपण सुखाचे आनंदाचे मनभर

नव वर्ष शुभेच्छा आभाळभर


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Inspirational