STORYMIRROR

स्वप्नील चंद्रकांत जांभळे

Inspirational

4  

स्वप्नील चंद्रकांत जांभळे

Inspirational

सर्व आमचं लई भारी

सर्व आमचं लई भारी

1 min
405

काय गाव

काय मंदिर 

काय माणसं

सर्व आमचं लई भारी


काय पाऊस

काय निसर्ग

काय वारा

सर्व आमचं लई भारी


काय झाडी

काय वाडी

काय नदी

सर्व आमचं लई भारी


काय शिमगा

काय होली

काय पालखी

सर्व आमचं लई भारी


काय डोंगर

काय धबधबा

काय तो थंडावा

सर्व आमचं लई भारी


काय शाळा

काय मास्तर

काय मित्र

सर्व आमचं लई भारी


काय कांदा

काय मिरची

काय भाकरीची नेहरी

सर्व आमचं लई भारी


काय शेती

काय गुरं

काय चिखल

सर्व आमचं लई भारी


काय कोकण

काय भजन

काय कीर्तन

सर्व आमचं लई भारी


काय कायदेपंडित आंबेडकर

काय स्वातंत्रवीर सावरकर

काय लोकमान्य टिळक

काय साने गुरुजी

काय महान विचार

सर्व आमचं लई भारी



साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Inspirational